23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeगुरूराज पुजारी पटकावले वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक

गुरूराज पुजारी पटकावले वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टर गुरुराज पुजारीने पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल २०२२ मधील भारताचे हे दुसरे पदक आहे. या सामन्यातील सुवर्णपदक मलेशियाच्या मोहम्मद अंजीलने पटकावले. त्याचवेळी पापुआ न्यू गिनीच्या मोरे बेयूने रौप्य पदक जिंकण्यात यश मिळविले. गुरुराज पुजारीने केवळ २६९ किलो वजन उचलून पदक जिंकले. पुजारीने स्रॅचमध्ये ११८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १५१ किलो वजन उचलले.

सुवर्ण विजेत्या गुरुराजाचा आतापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. त्याचे वडील ट्रक चालक होते. गुरुराजाला आणखी चार भाऊ आहेत आणि एवढ्या मोठ्या कुटुंबासोबत राहणे कधीच सोपे नव्हते. गुरुराजाचे वडील त्याला वेटलिफ्टरला आवश्यक असलेला आहार देऊ शकत नव्हते. पण या गरीब कुटुंबातील मुलाने हार मानली नाही. वेटलिफ्टरपूर्वी गुरुराजा कुस्तीपटू होता. २००८ साली सुशील कुमारने ऑलिम्पिक पदक जिंकून हा खेळाडू खूप प्रभावित झाला होता. कर्नाटकातील उडीपी जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणा-या गुरुराजाने आपणही देशासाठी पदक जिंकणार असा निर्धार केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या