23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रचीनला व्यवसाय देण्यासाठीच ‘हर घर तिरंगा’ मोहीम

चीनला व्यवसाय देण्यासाठीच ‘हर घर तिरंगा’ मोहीम

एकमत ऑनलाईन

मुंबई : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘हर-घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चीनला व्यवसाय देण्यासाठी ‘हर-घर तिरंगा’ मोहीम सुरू आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन केले आहे. खरे तर महात्मा गांधी यांनी पहिल्यांदा स्वदेशीचा नारा दिला होता. मात्र, आता स्वदेशीचा नारा कुठं राहिला. आज भारतात जो राष्ट्रध्वज भारतात येतो आहे, तो चीनमधून येतो आहे. चीनला व्यवसाय देण्यासाठी ‘हर-घर तिरंगा’ मोहीम सुरू आहे’’, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

राष्ट्रध्वज लावण्याला आमचा विरोध नाही. तो आपला सन्मान आहे. तिरंग्याशी काँग्रेसचे विचार जोडले आहेत. मात्र, याच राष्ट्रध्वजाचा वापर करून केंद्रातील मोदी सरकार इव्हेंट करत आहे. यासाठी लागणारा साहित्य चीनमधून आणल्या जात आहे. आज ‘हर-घर तिरंगा’च्या नावाने आपल्या देशाचा पैसा लुटून चीनला देण्याचा घाट या मोदी सरकारने घातला आहे. याचा विचार देशातील जनतेने करावा’ , असेही नाना पटोले म्हणाले.

अरुणाचल प्रदेश, लडाखचा काही भाग चीने ताब्यात घेतला आहे. मात्र, केंद्र सरकार त्यावर एकशब्दही बोलत नाही. याचा अर्थ आपला देश चीनकडे गहाण ठेवला जात आहे, अस चित्र निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या