18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रहरिभाऊ बागडे यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा

हरिभाऊ बागडे यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय जनता पक्षात आदराने घेतल्या जाणा-या नावांपैकी एक असलेले माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आता आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून बागडे यांनी आतापर्यंत सहा वेळ विजय मिळवला आहे. आपल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विधानसभा अध्यक्षपदावर देखील काम केले आहे. मात्र आता ७७ वर्षांचे झालेल्या बागडे नानांनी स्वत:च विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दीपावली मिलन कार्यक्रमात बोलतांना बागडे म्हणाले की, सालगडयाचे माझे दीड वर्ष शिल्लक राहिले आहेत, त्यानंतर मला सालगडी म्हणून राहयाचे नाही, असे म्हणत बागडे यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. बागडे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. मात्र हे माझे मत असून, पक्षाचे मत नाही. त्यामुळे पक्षाकडून जो आदेश येईल त्याप्रमाणे मी पुढील काम करेल असे बागडे म्हणाले.

याबाबत बोलतांना हरिभाऊ बागडे म्हणाले की, आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक न लढण्याचा मी निर्णय घेतला आहे. मात्र सक्रीय राजकारणातून मी बाजूला जाणार नाही. ज्यांनी माझ्यासाठी कामे केली आहेत, त्यांच्यासाठी मला काम करायची आहे. त्यामुळे यापुढे मतदारसंघातील कार्यकर्ते, नागरिक यांच्यासाठी काम करणार असल्याचे बागडे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या