25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडाआशियाई वेट लिफ्टिंगमध्ये पुण्याच्या हर्षदा गरुडने पटकावले कांस्यपदक

आशियाई वेट लिफ्टिंगमध्ये पुण्याच्या हर्षदा गरुडने पटकावले कांस्यपदक

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : भारताची जागतिक ज्युनियर चँम्पियन हर्षदा गरुड हिला आशियाई वेट लिफ्टिंगमध्ये रविवारी कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने ४५ किलो वजनी गटात एकूण १५२ किलो ग्राम वजन उचलले. या स्पर्धेत भारताने जिंकलेले हे पहिलं पदक आहे. हर्षदा कडून जरी सुवर्ण पदकाची अपेक्षा असली तरी तिने मिळविलेल्या यशामुळे देशभरातून कौतूक होत आहे.

अशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या ६८ किलो वजनी गटात हर्षदाने स्रॅचमध्ये ६८ किलोग्राम वजन उचलले. त्यानंतर क्लीनं अँड जर्कमध्ये ८४ किलोग्राम वजन उचलले. हर्षदाने एकूण १५२ किलो वजन उचलत कांस्यपदकावर कब्जा केला. व्हिएतनामच्या माय फुओंग खोंगनं एकूण १६६ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तिने स्रॅचमध्ये ७८ आणि क्लीन अँड जर्कमध्ये ६६ किलो वजन उचललं. तर, इंडोनेशियाच्या सिती नफिसातुल हरिरोहनं एकूण १६२ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. तिने स्रॅचमध्ये ७१ आणि क्लीन अँड जर्कमध्ये ९१ किलो वजन उचलले.

हर्षदाच्या कामगिरीवर कौतूकाचा वर्षाव
हर्षदानं ग्रीसमध्ये झालेल्या २०२२ आयडब्लूएफ ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली होती. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये तिनं १५३ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी तिने स्रॅच ७० आणि क्लीन अँड जर्क ८३ किलोग्राम वजन उचलले होते.

वेटलिफ्टिंगमध्ये भारताची जबरदस्त कामगिरी
वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारत दिवसेंदिवस पाया मजबूत करत आहे. अलिकडेच इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टरने लक्ष वेधले होते. या स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकली होती. ज्यात २२ सुवर्ण, १६ रोप्य आणि २३ कांस्यपदकांचा समावेश होता. यातील 10 पदके भारताने वेटलिंिफ्टगमध्ये जिंकली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या