27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयसोने लपवण्याचा धक्कादायक प्रकार तुम्ही पाहिलाय का?

सोने लपवण्याचा धक्कादायक प्रकार तुम्ही पाहिलाय का?

एकमत ऑनलाईन

केरळ : सोन्याच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर सोन्याच्या तस्करीचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. डाळ, भात किंवा खिचडी असे रोजच्या जेवणातील पदार्थ तयार करण्यासाठी ज्या कूकरचा वापर केला जातो. अशा कूकरचा वापर करून सोन्याची तस्करी केली जात होती. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे.

केरळच्या कालीकत आंतराराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीकडे प्रेशर कूकर होता तपासणी दरम्यान दिसून आलं की या कूकरमध्ये सोनं लपवलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आजूबाजूचे सगळेच लोक चकीत झाले. कूकरच्या तळाला ७०० ग्राम सोनं सापडलं. तपासणी केल्यानंतर या माणसाला अटक करण्यात आली असून सोनं आणि कूकर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वी साबणातून सोन्याची तस्करी होत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या