Tuesday, September 26, 2023

प्रेयसीला भेटण्यासाठी तो बनला मुलगी अन्….

तरुणाला पकडताच पोलिसांना धक्का बसला : प्रेयसीला भेटण्याची इच्छा तरुणाला चांगलीच महागात पडली

वलसाड : लॉकडाऊनचा फटका प्रेमी युगलांना बसला आहे. ‘प्रेमासाठी काहीही’ हा डायलॉग गुजरातमधील एका प्रियकराला लागू होतोय. लॉकडाऊनमध्ये प्रेयसीला भेटण्याची उत्कंठा लागली, आणि या उत्कंठेप्रती त्याने प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क मुलींसारखं वेशांतर केलं. मुलींसारखा पंजाबी ड्रेस, पावडर, लिपस्टिक लावून हा तरुण प्रेयसीला मध्यरात्री भेटण्यासाठी निघाला. मात्र त्याचा हा प्रयत्न असफल झाला आणि तो पकडला गेला.

ही घटना वलसाड येथील परडी भागातील आहे. येथे एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी मध्यरात्री पकडलं. मुलीच्या वेशातील तरुणाला पकडताच पोलिसांना धक्का बसला. पोलीस महिला आणि मुलींची चौकशी करत नाहीत, यामुळेच प्रियकराने प्रेयसीला भेटण्यासाठी मुलींचं वेशांतर केलं. मध्यरात्री २ वाजून ४० मिनिटांनी हा प्रियकर तरुण घराबाहेर पडला. पोलीस मुलींना विचारत नाहीत या आत्मविश्वासाने बाहेर पडलेला तरुन चांगलाच फसला.

Read more  भारत-चीन तणाव वाढला!

एवढ्या रात्री एक मुलगी स्कुटी घेऊन घरा बाहेर पडल्याने पोलिसांना संसय आला. हा तरुण घरातून निघाला होता. पोलिसांनी त्याला भोसलापाडा-परिया रोडवर अडवलं. पोलिसांनी एवढ्या रात्रीचं बाहेर का फिरते? असा सवाल केला. मात्र बिंग फुटू नये म्हणून मुलीच्या वेशातील तरुणाने तोंडातून एक शब्द काढला नाही. यामुळे पोलिसांनी त्याच्या चेहऱ्यावरील ओढणी हटवली असता त्यांना धक्का बसला. पोलिसांनी याबाबतची माहिती देताना तरुणाने सांगितलं की, चकमा देण्यासाठी मुलींचं वेशांतर केलं.

तथापि, तरुणावर महामारी कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला मॅजिस्ट्रेटसमोर नेण्यात आलं. दरम्यान, त्याची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली. प्रेयसीला भेटण्याची इच्छा तरुणाला चांगलीच महागात पडली.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या