26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयदेशात ३६ हजार मंदिर पाडून मशिद बांधल्या

देशात ३६ हजार मंदिर पाडून मशिद बांधल्या

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : देशाततर मंदिर-मशिदीवरून नवनवे वाद समोर येत आहेत. अशातच तेलंगणाचे भाजप प्रमुख बी.संजय कुमार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर कर्नाटकातील आमदार के.एस. ईश्वरप्पा यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. देशात मुस्लिम आक्रमकांनी ३६ हजार मंदिरे पाडून त्यावर मशिदी बांधल्या, असे ईश्वरप्पा म्हणाले आहेत.

कर्नाटकात पुन्हा एकदा मंदिर-मशीद वाद उफाळून आला आहे. कर्नाटकचे भाजप आमदार ईश्वरप्पा यांनी आज या संदर्भात धक्कादायक दावा केला. आता मंदिर उभारणीसाठी कायदेशीर लढाई लढली जाणार आहे. मशिदी इतरत्र बांधण्यास सांगितले जाईल आणि नमाज अदा करण्यास परवानगी दिली जाईल, परंतु ते मंदिराऐवजी मशीद बांधू देऊ शकत नाहीत. सर्व ३६ हजार मंदिरे कायदेशीररीत्या ताब्यात घेतली जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या