Tuesday, September 26, 2023

धडा पासून वेगळं झालं डोकं : बाईकच्या चेनमध्ये अडकला महिलेचा ‘स्कार्फ’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आपल्या मुलीला भेट देण्यासाठी दोन तरुणांसह दुचाकीवरून निघालेल्या एका वृद्ध महिलेचा दुःखद मृत्यू झाला. दुचाकीच्या चाकांमध्ये महिलेचा स्कार्फ अडकला तर तिची मान धडा पासून छाटली गेली आणि दूर जाऊन पडली. थरकाप उडवणारी ही घटना पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तसर रोडवर राहणारे नीरज शर्मा आणि विजय हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून कामासाठी मुक्तसरकडे जात होते. लॉकडाऊनमुळे बस नसल्याने विजयच्या शेजारी राहणाऱ्या सुखपाल कौर या दोन तरुणांसह दुचाकीवरून मुक्तसर येथे राहणाऱ्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. ते नुकतेच वाडा दराका गावाजवळ पोहोचले होते की सुखपाल कौरचा स्कार्फ दुचाकीच्या चेनमध्ये अडकला ज्यामुळे तिची मान धडा पासून वेगळी झाली आणि त्या जमिनीवर पडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Read More  पोलिसही गेले चक्रावून : एकाच IMEI क्रमांकाचे तब्बल १३ हजार फोन

या प्रकरणात नीरज शर्मा आणि विजय कुमार म्हणाले की, वयस्कर महिला दुचाकीवर बसली होती आणि अचानक स्कार्फ दुचाकीच्या चाकात अडकल्यामुळे हा अपघात झाला. ते म्हणाले की, महिलेला मुक्तसर येथे आपल्या मुलीला भेटायला जायचे होते, म्हणून ती आमच्याबरोबर दुचाकीवर बसून जात होती की अचानकच हा अपघात झाला.

या प्रकरणाचे तपास अधिकारी एएसआय हाकम सिंह यांनी सांगितले की, मृत महिला लॉकडाऊनमुळे बस नसल्याने मुक्तसर जाण्यासाठी शेजाऱ्याच्या दुचाकीवरून जात होती. गळ्यातील स्कार्फ अडकल्याने तिचा मृत्यू झाला. मृताचा मुलगा जसवीर सिंह याच्या निवेदनावर सीआरपीसीच्या कलम 174 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या