24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeअयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी 4 जूनला होणार सुनावणी

अयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी 4 जूनला होणार सुनावणी

एकमत ऑनलाईन

लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 आरोपींचे जवाब नोंदवले जाणार

नवी दिल्ली: अयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी  दाखल याचिकेवर सीबीआय विशेष न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने न्यायालयाकडे वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने बचावकर्त्यांची विनंती मान्य करत 4 जूनला पुढील सुनावणी घेतली जाईल असे सांगितले. दरम्यान, 4 जूनला होणाऱ्या सुनावणी दरम्यान, बाबरी मशीद पाडकाम प्रकरणात भाजप नेते लाल कृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह 32 आरोपींचे जवाबही नोंदवले जाणार आहेत.

दरम्यान, 8 मे 2020 रोजी सर्वोच्च न्यायालाने एक आदेश काढत या प्रकरणाची सुनावणी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने सुनावणी पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयाचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढवला होता. तसेच, म्हटले होते की, या प्रकरणाचा निकाल 31 ऑगस्ट 2020 पर्यंत दिला जावा. न्यायालयाने असेही म्हटले होते की, सीबीआय कोर्टात या प्रकरणाची सुनावणी व्हि़डिओ कॉन्फरन्सद्वारे केली जावी. साक्ष नोंदविण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सूविधा आहे आणि त्याचा वापर केला जावा.

Read More  केवळ ‘ताप’ मोजणं ही मोठी ‘चूक’, उद्धव ठाकरेंनी सांगितलं ‘कोरोना’ प्रसाराचं कारण

या प्रकरणात लाल कृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासोबतच राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह, माजी खासदार विनय कटियार आणि साध्वी ऋतंबरा यांच्यावर बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढांचा पाडण्याचा कट रचल्याचा आणि त्यात सहभाही झाल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल 2017 मध्ये दिलेल्या आदेशात केला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी असलेल्या विहिंप नेता अशोक सिंघल, विष्णु हरि डालमिया यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई संपवण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या