25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर ३ ऑगस्टला सुनावणी

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर ३ ऑगस्टला सुनावणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतील आमदारांनी आपली भूमिका वेगळी असल्याचे सांगून एक गट तयार केला आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गट पक्ष आमचा असल्याचे सांगत कोर्टात गेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे.

कारण पूर्वी १ ऑगस्टला त्यावर सुनावणी होणार होती. आता ३ ऑगस्टला होणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर केले आहे. १६ आमदारांच्या निलंबन प्रकरणी अद्याप सुनावणी बाकी असून त्याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटांत मागच्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरू आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूकडील मोठ्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली
जेव्हापासून दोन गट विभक्त झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्रात एक वेगळे राजकारण पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत दोन्ही गटांनी पक्ष आणि पक्षाच्या झेंड्यावर निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ आणि कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले होते.

आता नेमकी पक्ष आणि पक्षाचा झेंडा कुणाच्या पारड्यात जाणार याकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिशीनंतर शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती.

सरकार स्थापनेतही अडथळे येण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. विशेष म्हणजे सध्या जे काही सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतकाच विस्तार झाला आहे. तसेच सरकार स्थापनेतही अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात सध्या तारीख वाढल्याने आता महाराष्ट्र तीन तारखेची वाट पाहत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या