27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeओबीसी आरक्षणावर सोमवारी सुनावणी

ओबीसी आरक्षणावर सोमवारी सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ९२ नगर परिषदांमध्ये आरक्षण लागू करावे, अशी सरकारची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला. पण हा निकाल देताना ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकीत हे आरक्षण लागू होणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते. कोर्टाचे म्हणणे होते की, ज्यावेळी आम्ही हा निकाल दिला, त्यावेळी ज्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तिथे आरक्षण लागू करता येणार नाही. पण यावरूनच राज्य सरकारने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

सुप्रीम कोर्टात निकालात पुनर्विलोकनाची याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, ज्यावेळी कोर्टाने निकाल दिला, त्यावेळी कुठले ही नोटिफिकेशन या निवडणुकीचे निघाले नव्हते, हा सरकारचा दावा. त्यामुळे कोर्टाने याचा विचार करावा. राज्य सरकारने जो निर्णय घेतला, त्यानुसार या ९२ नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्षपदाचे आरक्षण लागू होणार आहे. मग यात ओबीसी आरक्षण लागू होणार नसेल, तर हा एक प्रकारे अन्याय आणि विरोधाभास ठरेल. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. उद्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. जर सरकारची ही मागणी लागू झाली तर शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा विजय ठरेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या