21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयअग्निपथविरोधातील याचिकांवरील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी

अग्निपथविरोधातील याचिकांवरील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी २५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं सर्व याचिका एकत्र करण्यास सांगितलंय. अग्निपथ योजनेच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालय २५ ऑगस्ट रोजी सुनावणी करणार आहे.

अग्निपथ योजनेबाबत विविध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणा-या सर्व जनहित याचिका हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, सूर्यकांत आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने केरळ, पंजाब आणि हरियाणा, पाटणा आणि उत्तराखंडच्या उच्च न्यायालयांना या योजनेच्या विरोधात दाखल केलेल्या सर्व जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करा, असे सांगितले आहे. जोपर्यंत दिल्ली उच्च न्यायालय निर्णय घेत नाही तोपर्यंत निर्णय स्थगित ठेवण्यास सांगितले आहे.

अनुच्छेद २२६ नुसार होणार कार्यवाही?
या न्यायालयासमोर दाखल झालेल्या तीन रिट याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित केल्या जाव्यात आणि घटनेच्या अनुच्छेद २२६ नुसार त्यांची संख्या बदलली जावी, असे आमचे मत आहे असे खंडपीठाने म्हटले आहे. सामान्यत: आम्ही याचिकाकर्त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात नव्याने जाण्याचे स्वातंत्र्य देऊन या याचिका निकाली काढल्या असत्या, परंतु याचिका मागे घेण्याच्या आणि नव्याने दाखल करण्याच्या प्रक्रियेत विलंब होऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलण्याचे टाळले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या