23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवारी सुनावणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवारी सुनावणी

एकमत ऑनलाईन

निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, सरन्यायधीशांचे आदेश
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सलग दुस-या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आता पुन्हा या प्रकरणी सोमवारी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या नेतृत्वातील आजची सुनावणी पार पडली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, या प्रकरणी निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकतो. मात्र, निर्णय घेऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले.

तर, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्यांवर प्रलंबित असलेल्या याचिकेवरील सुनावणी आठ ऑगस्ट रोजी होणार आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवायचे का, याचा निर्णयही सोमवारी होणार आहे.

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी, मुकुल रोहीतगी सारखे दिग्गज विधिज्ञ यांनी कोर्टात युक्तिवाद केला. तर अरविंद दातार हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत होते.

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरू झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली आहे.

आजच्या सुनावणीतील दहा महत्वाचे मुद्दे

अकरा वाजेच्या सुमारास कोर्टात सुनावणी सुरु

शिंदे गटाकडून हरीश साळवेंचा युक्तिवाद, पक्षविरोधी काम करताहेत या स्वत:च्या धारणेवरुन सदस्यांना अपात्र ठरवू शकतात का? साळवेंचा सवाल

पक्षांतरबंदी कायदा पक्षांतर्गत मतभेदांशी निगडीत नाही, हरीश साळवेंचा युक्तिवाद; यावर सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, मग व्हिपचा अर्थ काय?

राजकीय पक्षाला आपण पूर्णपणे दुर्लक्षित करु शकत नाही, सरन्यायाधीशांचं मत तर बंडखोरांनी पक्ष सोडलेला नाही, असा हरीष साळवेंचा युक्तिवाद, पात्रतेच्या निर्णयाला विलंब झाल्यास आतापर्यंच्या निर्णयांचं काय? अध्यक्षांविरोधात आवाज उठवणं नवीन नाही,शिंदे गटाचे वकील हरीष साळवेंचा युक्तिवाद यावर राजकीय प्रश्न असल्याने निवडणूक आयोगाला कसं रोखू शकतो? कोर्टाचा सवाल

आमच्यासाठी बंडखोर आमदार अपात्र, अपात्र ठरलेले लोक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत, ठाकरे गटाकडून सिब्बल यांचा युक्तिवाद; दोन गट मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाहीत का? कोर्टाचा सवाल

बंडखोरांकडून राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यात गल्लत केली जातेय, सिब्बल यांचा युक्तिवाद

दहावी सूची आणि आयोगाचं कार्यक्षेत्र वेगळं, विधिमंडळातील घडमोडींचा राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी संबंध नाही, निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांचा युक्तिवाद

दहावी सूची निवडणूक आयोगाला लागू होत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र घटनात्मक संस्था, निवडणूक आयोगाकडून दातार यांचा युक्तिवाद

पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, सुप्रीम कोर्टाचे आयोगाला आदेश, आजची सुनावणी संपली

सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय : सुप्रीम कोर्ट

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवार, ८ ऑगस्ट रोजी सुनावणी, आयोगानं नोटिशीबाबत वेळ वाढवून द्यावा, अशा सुप्रीम कोर्टाच्या सूचना

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या