24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयसत्तासंघर्षावर सुनावणी अनिश्चित

सत्तासंघर्षावर सुनावणी अनिश्चित

एकमत ऑनलाईन

अद्याप घटनापीठ नेमलेलेच नाही
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवार, दि. २५ ऑगस्ट रोजी पाच सदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार असल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी काल मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान म्हटले होते. तसेच लगेचच पाच सदस्यीय पीठाची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत पाच सदस्यीय घटनापीठाची नेमणूकच झालेली नाही. तसेच उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या यादीतही यासंबंधीच्या सुनावणीचा उल्लेख नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरू होती. ऐनवेळी २२ ऑगस्टला होणारी सुनावणीही पुढे ढकलली. त्यानंतर २३ ऑगस्टची सुनावणीही अनिश्चित होती. मात्र, ऐनवेळी शिवसेनेचे वकिल कपिल सिब्बल यांनी आग्रह धरल्याने ऐनवेळी सुनावणी घेत यासंदर्भात ५ सदस्यीय पीठ नेमून दि. २५ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येईल, असा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सुनावला होता. त्यामुळे आता ५ सदस्यीय घटनापीठासमोर दि. २५ पासून सुनावणी सुरू होईल, असे अपेक्षित होते. मात्र, कालपासून एक तर पाच सदस्यीय पीठाची नेमणूकच झाली नाही. त्यात उद्याच्या कार्यसूचीतही या खटल्याच्या सुनावणीचा उल्लेख नाही. त्यामुळे सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जोपर्यंत सुनावणी सुरू आहे, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णयही रखडण्याची चिन्हे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या