24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता २९ ऑगस्टला?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता २९ ऑगस्टला?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शिवसेनेच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले होते. त्यानुसार आज सुनावणी होणे अपेक्षित होते पण ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. २९ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्याने पुढें ढकलली जात होती. वारंवार तारीख पुढे जात असल्याने शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले होते.

दरम्यान, शिवसेनेशी बंड करत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदारांना घेत गुवाहटी गाठली होती. त्यानंतर शिवसेनेचे आपल्या आमदारांनी व्हीप न पाळल्यावरून गेलेल्या १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती.

त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे सुनील प्रभू यांना काढून टाकत भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड केली होती. त्यानंतर या निवडीवर आक्षेप घेत शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या वादावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत असून आता ही सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या