39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeदिलासादायक बातमी : केरळहून १०० डॉक्टरांचे पथक महाराष्ट्रात दाखल!

दिलासादायक बातमी : केरळहून १०० डॉक्टरांचे पथक महाराष्ट्रात दाखल!

एकमत ऑनलाईन

केरळमध्ये कोरोना संकटाला रोखण्यास मदत : हा अनुभव मुंबईमध्ये रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६५ हजारांच्या पार गेली असून सर्वाधिक रूग्ण मुंबईत आढळले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्राच्या साथीला केरळची मेडिकल टीम आली आहे. रविवारी केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी याबद्दल माहिती आहे. महाराष्ट्राला कोव्हिड-१९ विरूद्ध लढण्यास मदत करण्यासाठी १०० डॉक्टर्स आणि नर्सची टीम रवाना झाली आहे. ‘Doctors without borders!’, असे म्हणत त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्ये यातील ५० जणांची टीम काम करणार आहे.

केरळच्या टीव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे डेप्युटी सुपरिटेंड संतोष कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली ही १०० जणांची टीम काम करणार आहे. मुंबईमधील आरोग्य यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी ही टीम काम करणार आहे. देशात काही महिन्यांपूर्वी केरळ मध्ये देशातील सर्वाधिक रूग्ण होते. मात्र वेळीच केलेल्या उपाययोजना आणि आरोग्य संकटांचा सामना करण्याचा केरळच्या डॉक्टरांचा अनुभव पाहता त्यांना केरळमध्ये कोरोना संकटाला रोखण्यास मदत झाली. आता त्यांचा हाच अनुभव मुंबईमध्ये रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी होणार आहे.

मुंबईमध्ये पालिका रूग्णालय, खाजगी हॉस्पिटल्स यांच्यासोबतच अनेक ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर्स उभारण्यात आली आहेत. २५ मे रोजी महाराष्ट्रा कडून केरळकडून डॉक्टर, नर्सची मदत मिळावी असे पत्र पाठवण्यात आले होते. त्याला सकारातमक प्रतिसाद देत आता केरळकडून खास मेडिकल टीम महाराष्ट्राच्या मदतीला सज्ज आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारा चर्चा देखील केली होती.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या