22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रटोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये जोरदार मारामारी

टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये जोरदार मारामारी

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील वाद काही नवीन नाही. नेहमीच हा टोलनाका वादाच्या भोव-यात असतो. सतत चर्चेत असणा-या या टोलनाक्यावर मारामारीचा प्रकार घडला आहे. टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल कर्मचारी महिला यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आहे. या मारामारीचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत पुण्याला जात होते. त्यांनी बुधवारी संध्याकाळी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्वत:चे शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली. त्यावर टोलनाक्यावरील महिला कर्मचा-यांनी तुम्हाला टोल भरावाच लागेल, कार्ड चालणार नाही, असे सांगितले, त्यानंतर सीआरपीएफ जवानाच्या पत्नीमध्ये आणि टोल कर्मचारी महिलेमध्ये बाचाबाची झाली, काही वेळातच त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.

पिंपळगाव टोलनाका नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असतो. अनेक वेळा टोलनाक्यावरील कर्मचारी अरेरावीची भाषा वापरतात, दमदाटी करतात, असा आरोप वाहनचालकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी तर थेट नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचीच गाडी टोल कर्मचा-यांनी अडवली होती. त्या विषयावर सचिन पाटील आणि टोल कर्मचा-यांमध्ये वाद झाला होता, तेव्हा ही सबंधित पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोलनाका कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या