21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार

राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांना पुन्हा झोडपून काढले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस पडताना दिसत आहे.

तर, हवामान खात्याकडून पुढचे काही तास पावसाचे राहणारा असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाच्या कोसळधारा सतत सुरूच आहेत. सातारा, सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूरलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.

पंचगंगा धोका पातळीकडेच
कोल्हापूर जिल्ह्यात आज, गुरुवारी आणि काल बुधवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज सकाळी पंचगंगेची पातळी ४१ फूट ७ इंच इतकी असून, धोक्याच्या पातळीच्या (४३ फूट) दिशेने वाटचाल सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू केले आहे.

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप
आज सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. पण, शिराळा तालुक्यासह वारणा (चांदोली) धरण परिसरात पाऊस सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसात काल पाच फुटांनी वाढून २५ फुटांवर गेली आहे.

कोयना नदीत आज पाणी सोडले जाणार
कोयना धरण पायथा विद्युत गृहातून आज (गुरुवार) दुपारी तीन वाजता २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापन आणि सातारा जिल्हा प्रशासनाने केले आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आज १२ वाजता मुठा नदी पात्रामध्ये साधारण ३,४२४ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरल्यामुळे हा विसर्ग केला जाणार आहे.

पुण्यात पावसाची संततधार सुरूच
भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. कालपासून पुण्यात संततधार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. दोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या