28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार; लोकल सेवा विस्कळीत

मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार; लोकल सेवा विस्कळीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील काही भागात पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान पुणे आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील मुख्य शहर असणा-या मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आज आणि उद्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १६) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र ते ईशान्य बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. मान्सूनच्या आसाचा पश्चिम भाग सर्वसाधारण स्थितीत तर पूर्व भाग दक्षिणेकडे राहण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या