22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeनांदेडमध्ये पुन्हा मुसळधार

नांदेडमध्ये पुन्हा मुसळधार

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून संततधार पाऊस झाला. मध्येच पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा नदी, नाल्यांना पूर आला. प्रामुख्याने हिमायतनगर, किनवट व धर्माबाद तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्पाचे सकाळी ११.२० वाजता २ गेट उघडून २४४३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडला. या पावसामुळे शिल्लक पिकेही धोक्यात आली आहेत. दरम्यान, नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक अनेक मार्ग बंद झाले होते.

किनवट तालुक्यात सोमवारी रात्रीपासून सतत पाऊस सुरू आहे. रात्रभर झालेल्या रिमझिम पावसाने सकाळी जोर धरला. सकाळपासून दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे किनवटमधील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला. सध्या सतत पाऊस सुरू आहे. सर्व ग्रामसेवकांना मुख्यालयी उपस्थित राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. इस्लापूर, जलधारा, शिवणी, आप्पारावपेठ या भागात जास्त पाऊस झाला. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला.

पुलावरून पाणी वाहत असल्याने एक रुग्णवाहिका चार तास अडकून पडली. तसेच अनेक घरांत पाणी शिरले. हिमायतनगर शहरातील मुख्य रस्ते जाम झाले. तसेच श्री परमेश्वर मंदिराचा परिसर पाण्याच्या खाली आला. याशिवाय धर्माबाद-बाभळी रस्त्यावरून पाणी वाहात होते. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. इतर तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे.

गावांचा संपर्क तुटला, महामार्गाची वाहतूक ठप्प
कोसमेट, इस्लापूर, कुपटी, नांदगाव, आप्पारावपेठ, शिवणी, गोंडजेवली, मलकजामतांडा, मलकजाम, अमलापूर इ. गावचा संपर्क तुटला आहे. इस्लापूर ते किनवट रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. रेल्वे पुलाखाली पाणी खूप आहे. त्यामुळे रस्ता बंद आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक ७ तास ठप्प झाली होती.

हिमायतनगरला पुराचा वेढा
हिमायतनगर तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक तब्बल ७ तास ठप्प झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्र यासह अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याने मार्ग बंद झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या