22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रआधी अतिवृष्टी; आता पावसाचा खंड शेतक-यांची चिंता वाढली

आधी अतिवृष्टी; आता पावसाचा खंड शेतक-यांची चिंता वाढली

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या २३ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. तर अनेक भागात पिके माना टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे. जुलैमध्ये दोन वेळा आठवडाभर तर ऑगस्टमध्ये सलग चार दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे वार्षिक सरासरीच्या ८९.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र त्यानंतर गेले २३ दिवस पावसाचा पडलेला खंड शेतक-यांची चिंता वाढवणारा ठरत आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सोयगावमध्ये २२ दिवसांचा तर औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड या पाच तालुक्यांत २४ आणि कन्नड, खुलताबादेत २५ व फुलंब्रीत २७ दिवस पावसाने दांडी मारली आहे. यामुळे बळिराजाच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर, याचा मोठा फटका शेतक-यांना बसणार आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाकडून याचे पंचनामेसुद्धा करण्यात येत आहेत. अशात उरल्यासुरल्या पिकांना आता जगवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. मात्र त्यातच आता पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. वेळीच पाऊस न झाल्यास उरलेली पिकेही नष्ट होण्याची भीती आता बळिराजाला लागून आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या