23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरलातूरमध्ये मुसळधार

लातूरमध्ये मुसळधार

एकमत ऑनलाईन

विजांचा कडकडाट, रात्री सव्वाएकच्या सुमारास पावसाला सुरुवात
लातूर : लातूर शहर परिसरात शनिवारी रात्री सव्वाएकच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे लातूर शहर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्तेही तुडुंब भरून वाहात होते. विजांचा कडकडाटात पाऊस झाला. शनिवारी दिवसभर उकाडा सुरू होता. रात्रीही नागरिक उकाड्याने हैराण झालेले असतानाच रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.

रात्री सव्वाएकच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर अधिक असल्याने काही वेळातच रस्ते आणि नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जोरदार पावसामुळे सखल भागात सर्वत्र पाणी साठले होते. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

ऑगस्टच्या दुस-या आठवड्यापासून पावसाने दडी दिली होती. मात्र, १ सप्टेंबरपासून वातावरण बदलले असून, रोज कुठे तरी पाऊस हजेरी लावत आहे. दोन दिवसांपूर्वी लातुरात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, तुरळक ठिकाणीच पाऊस झाला होता. त्यातच शनिवारी वातावरणात प्रचंड उकाडा होता. कडक ऊन आणि उकाडा यामुळे जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यातच हवामान खात्यानेही लातूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
शनिवारी सव्वाएकच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर रात्री बराचवेळी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे लातूर शहर परिसरात सखल भागात पाणीच पाणी थांबले आहे. पुढील ३ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजन पडणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या