24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरलातूर परिसरात जोरदार पाऊस

लातूर परिसरात जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहर परिसरात गुरुवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचे वातावरण नव्हते. मात्र, दुपारनंतर वातावरण बदलले आणि लातूर शहर परिसरात सरीवर सरी जोरदार कोसळू लागल्या. ४ च्या सुमारास लातूर शहर परिसर, गंगापूर, पेठ, बुधोडा आदी भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जोरात सरी कोसळल्या. पाचच्या सुमारास तर शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

पावसाचा जोर अधिक असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच वाहनधारकांनाही वाहन पाण्यातून काढताना कसरत करावी लागली. यासोबतच सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले. गावभागातही नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्याने नाल्यातील कचरा रस्त्यावर साठल्याने वाहनधारकांना कच-यातून वाट काढताना कसरत करावी लागली. तसेच नालीचे पाणी रस्त्यावर आल्याने गाव भागात दुर्गंधीचा सामना करावा लागला. अगोदरच काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने शेतशिवारात पाणी थांबले आहे. त्यात रोजच पाऊस हजेरी लावत असल्याने खरीप पिके पुन्हा धोक्यात आली आहेत. ब-याच ठिकाणी सखल भागातील पिके वाया गेली आहेत. मात्र, जी पिके आली आहेत, तीदेखील अतिवृष्टीने वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.

सरीवर सरी कोसळत
असल्याने तारांबळ
लातूर शहर परिसरात दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. मध्येच पावसाचा जोर अधिक असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच मंडईतही भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ वाढली. अचानकच पावसाचा जोर वाढत असल्याने दुचाकीस्वारांची चांगलीच हैराणी झाली. ठिकठिकाणी वाहने थांबवून अनेकांना आडोशाला थांबावे लागले. सायंकाळच्या सुमारास नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या