22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रपुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. मुंबई-ठाण्यासह काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे पुढील २ दिवस सुटी जाहीर केली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या आज होणा-या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी केला होता. यात प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि पालघरचा भाग होता.
दरम्यान, आता पुन्हा एकदा पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

हवामानाचा अंदाज
मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. अधूनमधून ४५-५५ कि.मी. प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील तसेच ६० कि.मी. प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या