22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत वादळी वा-यासह जोरदार पाऊस

मुंबईत वादळी वा-यासह जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत शनिवारी रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते दादर या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईच्या चेंबूर परिसरात जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

जोरदार वारे सुटण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी घालण्यात आलेले मंडप सुरक्षित राहतील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले होते. हवामान विभागाने मुंबईसह, ठाणे, पालघर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे अहमदगर, पुणे, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूरमध्येदेखील पुढील तीन ते चार तासात पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानुसार मुंबईत आजपासून ३ दिवस पावसाचा व हवेचा जोर वाढण्याची शक्­यता आहे. गणेशोत्सव मंडळानी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्यास सांगावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे मंडपातील वीज, बत्तीमुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मंडपात पाणी शिरुन काही दुर्घटना घडू नये, विराजमान झालेला बाप्पापर्यंत पाणी पोहोचू नये किंवा सजावट खराब होणे यासाठी सतर्क राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळामुळे मंडप किंवा मंडपाच्या शेडचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीची गरज भासल्यास आपत्कालीन विभागाचा १९१६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केलं आहे. याशिवाय समितीला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लातूरमध्येही पाऊस
शनिवारी रात्री सव्वाएकच्या सुमारास लातूरमध्ये हजेरी लावली. शनिवारी दिवसभर सर्वत्र प्रचंड उकाडा होता. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात होती. रात्री उशिरा आकाशात ढग दाटून आले आणि सव्वाएकच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर बराचवेळी पावसाच्या सरी सुरू होत्या. त्यामुळे शहर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या