24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील अनेक भागात मुसळधार

राज्यातील अनेक भागात मुसळधार

एकमत ऑनलाईन

पुणे : यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली होती. दरम्यान, काल मान्सूनने अरबी समुद्रात प्रवेश केल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. (आयएमडी) या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वा-यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी १९ मे ते २१ मे दरम्यान विजांच्या कडकडाटा वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कालपासून या प्रदेशातील काही ठिकाणी पावसाने रिपरिप सुरु केली आहे.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील या भागांत पाऊस सुरु असून पावसाच्या नोंदीसंदर्भात भारतीय हवामान खात्याने माहिती दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रदेशात पावसाची नोंद झाली आहे. मोहोळ -१९, सांगोला – २३, माढा – २.४, हातकणंगले – ४८, गडहिंग्लज – ३५, राधानगरी – १९, आजरा – ६८, शिरोळ – ४८, शाहूवाडी – ९, पन्हाळा – ४०, गगनबावडा – ४७, चंदगड – ५५. कोकण प्रदेशातील – खेड – ८, लांजा – १३, चिपळूण – १८, देवरुख – ८, राजापूर – ३, मंडणगड – ०, पारनेर -२१, राहुरी -१.६, पाऊसाची नोंद झाली आहे.

पावसाची स्थिती
उद्या केरळ आणि तामिळनाडूजवळ पावसाचे ढग दिसत नाहीत. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रसह मराठवाडा आणि संपूर्ण गोव्यासह कर्नाटकच्या बहुतांश भागांत आणि अरबी समुद्रावर काही भागात ढगाळ वातावरण आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यातही अंशत: ढगाळ वातावरण असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या