38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeमराठवाडापुणे, नगर, नांदेड, परभणी, बार्शी, जालन्यात जोरदार पाऊस

पुणे, नगर, नांदेड, परभणी, बार्शी, जालन्यात जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

परभणीत वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू, शेतकर्‍याचे नुकसान

मुंबई : राज्याच्या अनेक भागात वळीव पावसाने हजेरी लावली आहे. सातारा, सांगली, नांदेड, परभणी, बार्शी, अहमदनगर, रत्नागिरी, पुणेसह अनेक भागांमध्ये वळवाचा पाऊस झाला. कुठे सोसाटयाच्या वाऱ्यासह तर कुठे विजेच्या कडकडाटाने पाऊस झाला. त्यामुळे मे महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी वळीव पाऊस
नांदेड, परभणीत मध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यूही झाला. जालन्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाचा पाऊस झाला. नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शिर्डीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. वाशिममध्येही सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. तर सोलापूरच्या बार्शीत वळीव पावसाने हजेरी लावली.

Read More  ७ हजार कोरोना योद्धा पोलिसांच्या मदतीला

हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता
पुणे शहरात कोथरुड, पाषाण, विद्यापीठ, शिवणे, वारजे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. ढगांच्या गडगडाटासह काही भागात मुसळधार पाऊस पडला.

अचानक धो-धो पाऊस सुरु झाला
पिंपरी-चिंचवड परिसराला वळीव पावसाचा फटका बसला. सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता, मात्र अचानक धो-धो पाऊस सुरु झाला. या पावसाने कोरोना विषाणूची धास्ती अधिक वाढली आहे. या विषाणूचा थंड हवेत आणखी प्रादुर्भाव वाढतो.

पावसामुळे नागरकरांची चांगलीच तारांबळ उडाली
अहमदनगर शहराला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन-चार दिवसांपासून अहमदनगरातील नागरिक वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झाले होते. मात्र आज झालेल्या पावसामुळे त्यांना जरा दिलासा मिळाला आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही वळीव पावसाने हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे नागरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तर उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना काहीसा दिलासाही मिळाला. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले.

Read More  वकील दिसणार आता पांढऱ्या शुभ्र कपड्यात

रत्नागिरीकरांना या पावसामुळे थोडासा गारवा मिळाला
वळीव पावसाने चिपळूणमध्ये हजेरी लावली आहे. चिपळूनमध्ये जोरदार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून चिपळूनमध्ये ढगाळ वातावरण होतं. काल तळकोकणात पावसानं हजेरी लावली होती. मात्र, आज पावसाने रत्नागिरीतही हजेरी लावली. आज सायंकाळी चिपळूणमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. उकाड्यानं हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना या पावसामुळे थोडासा गारवा मिळाला.

जिंतुरमध्ये वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू

परभणीत जिल्ह्यातील जिंतुरमध्ये वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. यात शेतकर्‍याचे चांगलेच नुकसान झाले आहे. जिंतुर तालुक्यातील चारठाणा या गावा

पासुन 12 कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे वाघी (धानोरा)येथील शामराव रावसाहेब खंदारे याच्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली चार बैल बांधलेले होते. गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी वादळी वाऱ्यासह वीजा कडाडल्या. तेव्हा लिबांच्या झाडाखाली उभ्या असलेल्या दोन बैलांवर वीज कोसळली. त्यात दोन्ही बैलांच्चा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रशासनाने पंचनामा केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या