26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रअमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांत अतिवृष्टी

अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांत अतिवृष्टी

एकमत ऑनलाईन

अमरावती: अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून गेल्या चोवीस तासांत सात तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने चारगड नदीला पूर आला आहे. या पुरामुळे राज्य महामार्ग क्रमांक ३६५ वरील चारगड नदीवरील पूल वाहून गेला.

दरम्यान, अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दारे १५० सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. धरणातून सध्या ३ हजार १५० घन मीटर प्रतिसेकंद विसर्ग (क्युसेक) सुरू आहे. याशिवाय पूर्णा प्रकल्पाची ९ दारे ५० से.मी. उघडण्यात आली असून १३६ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. शहानूर, सपन, पाक नदी प्रकल्पातूनदेखील पाणी सोडण्यात येत आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती, चांदूर बाजार या तालुक्यात अतिृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात चोवीस तासात ५७.५ मिमी पाऊस झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या