23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील विविध भागात मुसळधार

राज्यातील विविध भागात मुसळधार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महिनाभरापासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा राज्यातील विविध भागात हजेरी लावली आहे. लांबलेल्या पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली होती. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. लातूरसह बीड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, नाशिकसह मुंबई, पुणे, विदर्भातही पावसाने हजेरी लावली.

लातूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. १ सप्टेंबरपासून रोज कुठे ना कुठे जोरात पाऊस कोसळत आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतशिवारात पुन्हा पाणीच पाणी झाले आहे. एक तर पिकांना जीवदान मिळाले. परंतु ब-याच भागात मुसळधार पाऊस पडल्याने पिके पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका आहे.

बीड जिल्ह्यातील परळीत एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. एक तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मागच्या तीन आठवड्यांपासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे ब-याच भागात शेतातील उभी पिके माना टाकू लागली होती. मात्र, आज झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले.

हिंगोली जिल्ह्यातही आज पावसाने जोरदार हजेरी लावलीे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे हळद, तूर, कापूस आणि सोयाबीन यासारखी पिके वाळून चालली होती. आज झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. याशिवाय उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यातही ब-याच भागात पावसाने हजेरी लावली. रोज कुठे ना कुठे पाऊस बरसत असल्याने पिकांना दिलासा मिळाला. मात्र, काही भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने पिकांना पाणी लागण्याचाही धोका आहे.

जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले
जायकवाडी जलाशयातून शनिवारी सकाळी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटांनी उघडून ८० हजार क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्याने नदीला मोठा पूर आला. यामुळे गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर दत्तमंदिर व राक्षसभुवन येथील शनी महाराज मंदिर पुन्हा चौथ्यांदा पाण्यात बुडाले. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या