28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरमध्ये पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदी मोसमात तिस-यांदा पात्राबाहेर

कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदी मोसमात तिस-यांदा पात्राबाहेर

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : गेल्या २४ तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सलग कोसळणा-या पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधा-याजवळ पाणी पातळी ३१ फूट २ इंच इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट, तर धोका पातळी ४३ फुटांवर आहे. दरम्यान, पाणी पातळीत वेगाने वाढ झाल्याने पंचगंगा नदी तिस-यांदा पात्राबाहेर आली आहे.

राधानगरी धरणाचा एक दरवाजा सुरू
धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पॉवर हाऊस आणि उघडलेल्या दरवाजातून मिळून ३ हजार २८ हजार क्युसेकने भोगावती नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या