22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमुंबईत हेल्मेट सक्ती

मुंबईत हेल्मेट सक्ती

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई शहरामध्ये अनेक मोटारसायकलस्वार हे विनाहेल्मेट मोटारसायकल चालवितात, तसेच मोटारसायकल चालविणा-याच्या मागे बसलेली व्यक्तीसुद्धा हेल्मेटचा वापर करत नाही. अशा लोकांसाठी आता हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. या संबंधित परिपत्रक वाहतूक पोलिस मुख्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

काय आहेत नियम?
मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवित असताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा १९८८कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड तसेच ३ महिन्यांसाठी लायसेन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

अन्यथा कारवाईस सामोरे जा…
वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकाव्दारे नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांनी हेल्मेट वापरावे अन्यथा येत्या १५ दिवसांनंतर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या