24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeयंदाची ईद साजरी न करता मजुरांना मदत

यंदाची ईद साजरी न करता मजुरांना मदत

एकमत ऑनलाईन

सर्फराजने ठेवला समाजासमोर आदर्श

मुुंबई: स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा सर्फराज खान सध्या उत्तर प्रदेशातील आपल्या घरी अडकलेला आहे. बाहेरील राज्यातून घरी परतणा-या कामगारांना सर्फराज मदत करतानाचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

यानंतर सर्फराजने सध्याची परिस्थिती लक्षात घेता यंदाची ईद साजरी न करता मजुरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘आम्ही यंदा ईद साजरी करणार नाही असे ठरवलेय. ईदसाठी नवीन कपडे आणि वस्तू खरेदी करण्यासाठी जमवलेले पैसे मजुरांना मदत करण्यासाठी खर्च करायचं ठरवलं आहे.’’ ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनीही या काळात पुढे येऊन या गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन सर्फराजने केले आहे. तो ‘टाइम्स आॅफ इंडिया’ वृत्तपत्राशी बोलत होता.

Read More  लोहारा तालुक्यात कोरोनाबाबत नागरिकांत गांभीर्य दिसेना

सध्या कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मजूर गावी परतत आहेत. त्यांच्याकडे जेवण, पाणी काहीही नसतं. अशा लोकांना आम्ही जेवणाची पाकीटं आणि पाण्याच्या बाटल्या पुरवतो. आम्हीही रमजानच्या काळात उपास करतो, त्यामुळे पाणी आणि अन्नाचं महत्त्व काय आहे याची आम्हाला जाणीव आहे, सर्फराज बोलत होता. गेल्या हंगामात रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबईला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, परंतु सर्फराजने आपल्या फलंदाजीची चमक दाखवत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या