मुंबई : शीतल म्हात्रे आणि भाजपा आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विधानसभेतही आज या व्हिडीओचा विषय झाला. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असल्याचे सांगत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आज अधिवेशनात करण्यात आली आहे.
याबद्दल भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला आहे. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनामध्ये केली आहे.
तसेच आमदार यामिनी जाधव यांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. शीतल म्हात्रेंचे आयुष्य या प्रकरणात बरबाद होईल, असंही चौधरी म्हणाल्या आहेत.
याबद्दल बोलताना मनिषा चौधरी म्हणाल्या, शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. नगरसेविका राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत रॅलीतील व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे.
एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा स्वत:ला सिद्ध करायचे. यावर कधी कारवाई होणार? या मॉर्फिंगमुळे तिचे आयुष्य बरबाद होईल. ती विवाहीत महिला आहे. ज्याने हे केले त्यावर कारवाईचे आदेश द्यावेत.