28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रवारसा हा वास्तूचा नसतो; मनसेने शिंदे-ठाकरे गटाला सुनावले

वारसा हा वास्तूचा नसतो; मनसेने शिंदे-ठाकरे गटाला सुनावले

एकमत ऑनलाईन

मुंबई :‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोन्ही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ‘वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो’ अशा शब्दांत दोन्ही गटाला मनसेने सुनावले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. दसरा मेळावा आमचाच होणार, असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेकडून देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आमचाच होणार अशी भूमिका मांडली जात आहे.

 

या ट्विटसोबत त्यांनी राज ठाकरेंचा एक फोटो शेअर करत त्यावर ‘‘वारसा हा वास्तूंचा नसतो, विचारांचा असतो’’ हे त्यांचं वाक्य देखील लिहिलं आहे.

काल, उद्धव ठाकरे यांनी कितीही संभ्रम निर्माण करू देत, आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यासंदर्भात एकनाथ शिंदे गटाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत दसरा मेळाव्यासंदर्भात नेमकी चर्चा काय झाली हे गुलदस्त्यात आहे. या बैठकीला भरत गोगावले, भुमरे, उदय सामंत आणि आमदार बैठकीला उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र, शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिकेकडून प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क येथील परवानगीकरता दोनदा पत्र देऊनही पालिकेने अर्ज अनिर्णीत ठेवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या