23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयहायटेक चोरी : चोराने टेक्निकच्या मदतीने लंपास केले तब्बल ४२ लाख

हायटेक चोरी : चोराने टेक्निकच्या मदतीने लंपास केले तब्बल ४२ लाख

एकमत ऑनलाईन

पैसे चोरण्यासाठी हॅकिंग डिव्हाईसचा वापर?

गुरूग्राम: भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्लीजवळील गुरूग्राममध्ये एखाद्या हॉलिवूड सिनेमाप्रमाणे चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथे चोरांनी सीसीटीव्हीवर टेप केली आणि टेक्निकच्या मदतीने तब्बल ४२.३९ लाख रूपये लंपास केले. पोलिसांना रविवारी याची माहिती मिळाली. दरम्यान, या गुन्ह्यातील गुन्हेगारांची अद्याप ओळख झालेली नाही. ही घटना २३ मेला सुशांत लेक भागातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये झाली.

हा भाग सेक्टर २९ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो. पोलिसांनी सांगितले, २० मेला सेक्टर ५५ कॅशचा भरणा करणाऱ्या फर्मने एटीएममध्ये २८ लाख रूपये टाकले होते. तीन दिवसानंतर कंपनीची तक्रार आली की टेक्निकल कारणामुळे मशीन काम करत नाही.

मास्क घातलेले दोन पुरुष दिसत होते
तक्रार मिळाल्यानंतर कंपनीने एटीएमची तपासणी करण्यासाठी माणसे पाठवली. तपासणीदरम्यान आढळले की एटीएममधून ४२,३९,१०० रूपये गायब झाले होते. गिरीश पाल सिंग यांनी ही तक्रार केली होती. त्यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून ताब्यात घेतलेल्या फुटेजमध्ये मास्क घातलेले दोन पुरुष दिसत होते. २३ मेला साधारण २ वाजण्याच्या सुमारास त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या लेन्सला टेप लावली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, या गुन्ह्याची माहिती रविवारी मिळाली होती. तसेच एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजही हाती घेण्यात आले. एका तपास अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन कापण्यात आले नाही. प्राथमिक तपासानुसार त्यांनी रोख रक्कम चोरण्यासाठी हॅकिंग डिव्हाईसचा वापर करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३८०(चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More  महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ७० हजारांचा टप्पा

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या