24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Home8 राज्यांमध्ये हाय अलर्ट : पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरून पुढे सरकरणारं 'अंम्फन चक्रीवादळ'

8 राज्यांमध्ये हाय अलर्ट : पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरून पुढे सरकरणारं ‘अंम्फन चक्रीवादळ’

एकमत ऑनलाईन

एकीकडे कोरोनाचं महासंकट त्यामध्ये चक्रीवादळाची  भर

नवी दिल्ली, 20 मे : पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरून पुढे सरकरणारं ‘अंम्फन चक्रीवादळ’ आज रौद्र रुप धारण करेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर 8 राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या अनेक ठिकाणी वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं
ओडीसापासून अनेक ठिकाणी ताशी 155 ते 185 किमी वेगानं वारे वाहण्याशी शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदजानुसार पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि समुद्रात चार-पाच मीटर उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. समुद्र किनाऱ्याजवळचे अनेक परिसर रिकामे करण्यात आले असून तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

Read More  अम्फान चक्रीवादळ आज पश्चिम बंगाल, ओडिसा किनारी धडकण्याची शक्यता

रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली
अंम्फन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानतळावर उद्या संध्याकाळी 5 पर्यंत सर्व विमानं आणि सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे येत असल्यानं रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली आहेत. एकीकडे कोरोनाचं महासंकट असताना चक्रीवादळाची त्यामध्ये भर पडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या