22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्र  मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

  मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलेला दिलासा पुन्हा एकदा १६ सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला मंदाकिनी खडसे चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत.

वेळोवेळी त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावलेली आहे, अशी माहिती त्यांचे वकील मोहन टेकवडे यांनी कोर्टाला दिली, याची नोंद घेत हायकोर्टानं मंदाकिनी खडसेंना दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यापुढे सोमवारी मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.

खडसे कुुटुंबियांविरोधात ईडीकडने याप्रकरणी आरोपपत्र केलेलं आहे.

या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लाड्रिंगचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी अटकेत असलेले खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी याप्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय, असा आरोप केला होता.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं चौधरींचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साल २०१६ मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती, मात्र एसीबीने खडसेंना क्लीन चीट दिलेली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या