24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमुलीचा विनयभंग करणा-या डिलीव्हरी बॉयविरोधात हिंदू महासभा आक्रमक

मुलीचा विनयभंग करणा-या डिलीव्हरी बॉयविरोधात हिंदू महासभा आक्रमक

एकमत ऑनलाईन

पुणे : झोमॅटो डिलीव्हरी बॉयने पुण्यात एका मुलीचा विनयभंग केल्यानंतर हिंदू महासभा आक्रमक झाली असून कंपनी आणि सरकारकडे कर्मचा-याच्या माहितीची मागणी केली आहे. कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करताना डिलीव्हरी बॉयचे नाव आणि त्याची माहिती ग्राहकाला देण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे.

दरम्यान, सोमवारी पुण्यात एका डिलीव्हरी बॉयने ऑर्डर द्यायला आल्यावर मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वातावरण तापले असून काल पोलिसांनी डिलीव्हरी बॉयला अटक केली होती. रईस शेख (४०) असे या डिलीव्हरी बॉयचे नाव असून येवलेवाडी येथील एका सोसायटीत हा प्रकार घडला होता. त्यानंतर हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे.

फूड डिलीव्हरी सेवा देणा-या कर्मचा-याचे नाव कंपनीने ग्राहकांना अगोदर द्यावे, त्यानंतर ग्राहकांना ऑर्डर कन्फर्म करण्याची परवानगी असावी अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे. फक्त ग्राहकांच्या नावामुळे त्याचे घर, पार्श्वभूमी अशी माहिती उघड होते त्यामुळे गुन्हेगारीला उत्तेजन मिळू शकते असे मत दवे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर या सेवेसाठी आणि गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी वेगळी नियमावली तयार करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या