24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeहिंदू सेनेने जेएनयूच्या गेटवर लावले भगवे झेंडे

हिंदू सेनेने जेएनयूच्या गेटवर लावले भगवे झेंडे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) मधील झालेला वाद अद्याप संपलेला नाही. त्यानंतर आता जेएनयूच्या बाहेरील रस्त्यावर आणि मुख्य गेटजवळ भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर ‘भगवा जेएनयू ’ असे लिहिले आहे. हे पोस्टर्स आणि झेंडे हिंदू सेनेने लावल्याचे सांगण्यात येत आहे.

उजव्या विचारसरणीच्या हिंदू सेनेने शुक्रवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या मुख्य गेटवर भगवे ध्वज लावले. संघटनेने कथितरीत्या कॅम्पसभोवती पोस्टर चिकटवले होते, ज्यावर ‘भगवा जेएनयू’ लिहिले होते. याप्रकरणी हिंदू सेनेचे उपाध्यक्ष सुरजित यादव यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ज्यात त्यांनी जेएनयूमध्ये विरोधकांकडून भगव्याचा अपमान केल्याचे म्हटले आहे. या लोकांनी सुधारावे… भगव्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमचा आदर करतो. प्रत्येक धर्माचा आणि विचारांचा आदर करा. भगव्या रंगाचा ज्या प्रकारे अपमान केला जात आहे हिंदू सेना हे सहन करणार नाही, असे म्हटले आहे.

रामनवमीच्या दिवशी जेएनयूच्या कावेरी वसतिगृहाच्या मेसमध्ये कथित मांसाहार देण्यावरून दोन विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली तेव्हा दोन्ही बाजूचे डझनभर विद्यार्थी जखमी झाले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी वसतिगृहात येऊन मेस कर्मचा-यांना मांसाहार बनण्यापासून रोखले आणि तेथे उपस्थित विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला होता. त्याचवेळी, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त होणारी पूजा थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभाविपच्या सदस्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. जेएनयूएसयू, एसएफआय आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने एबीव्हीपीशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या