24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयप्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असणा-या हिंगांचे उत्पादन आतापर्यंत भारतात घेतले जात नव्हते. आता लवकरच भारतामध्येही हिंगाचे उत्पादन घेण्यात येणार आहे. पालमपूरमधील इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्सेस टेक्नोलॉजी (आयएचबीटी) या संस्थेच्या देखरेखीखाली हिंगाचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही हिमाचलमध्ये आता पाच हेक्टरमध्ये हिंगाचे पिक घेतले आहे. आम्ही हे उत्पादन वाढवण्याचा विचार करत असून, पुढील तीन वर्षामध्ये किमान ३०० हेक्टरवर उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे, असे दिल्लीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले़ येथील लाहुलच्या खो-यातील क्वरिंग गावामध्ये हिंगाचे पिक घेण्यात आले आहे. अशाप्रकारे देशामध्ये हिंगाचे उत्पादन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हिंग हे मूळचे इराण आणि अफगाणिस्तानचे पिक आहे. हे दोन्ही देश जगभरात हिंगाचा पुरवठा करतात. हिंग हे कोरड्या आणि थंड वाळवंटीय प्रदेशामध्ये घेतले जाणारे पीक आहे. हिंग भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात असले तरी ते युरोपीयन देशांमध्येही औषध म्हणून अनेक ठिकाणी वापरले जाते. भारत दरवर्षी ६०० कोटी रुपयांचे हिंग आयात करतो. मात्र आता हिंगाचे पिक घेतल्यानंतर भारताचा हा आयात खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

४ वर्षांपासून सुरू होते संशोधन
काऊन्सिल ऑफ सायन्टीफिक ऍण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएरआयआर) दिल्लीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शेखर मांडे यांनी अधिक माहिती देताना या विषयावर मागील चार वर्षांपासून काम सुरु असल्याचे सांगितले.

अफगाणिस्तान आणि इराणमधून आयात कमी होणार
भारतामध्ये हिंगाचे उत्पादन घेण्यासंदर्भातील संशोधन २०१६ पासून सुरु केले. हिंगाचे उत्पादन हे केवळ एकदम थंड आणि काही विशिष्ट ठिकाणी घेता येईल. लडाख, लाहुल-स्पितिच्या खो-यात हिंगाचे उत्पादन घेणे शक्य आहे. यापूर्वी आपण अफगाणिस्तान आणि इराणमधून हिंग आयात करायचो, असे डॉ. मांडे म्हणाले.

४० टक्के वापर भारतात
जगभरातील हिंगाच्या एकूण वापरापैकी ४० टक्के वापर हा एकट्या भारतात केला जातो. हिमाचल प्रदेश राज्य सकारने या प्रकल्पासाठी ४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याच निधीच्या मदतीने विशेष सेटअप तयार करण्यात आला आहे.

सहा प्रजातींचे घेतले जाणार उत्पादन
सीएसआयआर-आयएचबीटीने एकत्र येऊन हे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहेत. हिंगाच्या एकूण सहा प्रजातींचे उत्पादन घेतले जाणार आहे. इराणमधील मूळ बियाणांच्या आधारे भारतातील उत्पादन घेतले जाणार आहे. मागील ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये असा प्रयोग होत असल्याचे आयसीएआर-एनबीपीजीआरने म्हटले आहे. सीएसआयआर-आयएचबीटीने सीहॅब, रिबलिंग, लाहुल, स्पितीमध्ये हिंगाची लागवड केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या