28.4 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeउद्योगजगतशेअर बाजारात ऐतिहासिक उसळी

शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी

एकमत ऑनलाईन

निर्देशांकाने ओलांडला ६२ हजारांचा टप्पा
मुंबई : आज शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी दिसून आली. बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने ऐतिहासिक टप्पा गाठला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ६२ हजार अंकांचा टप्पा गाठला. बँक निफ्टी निर्देशांकानेदेखील आतापर्यंतचा उच्चांक गाठला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७६२ अंकांनी वधारत ६२,२७२ अंकांवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत २१६ अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी १८,४८४ अंकांवर स्थिरावला. आज दिवसभरातील व्यवहारात १८८६ कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. त्याशिवाय १४९४ कंपन्यांचे शेअर दर घसरले. त्याशिवाय १३३ कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. आज शेअर बाजारात बँकिंग, आयटी, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, इन्फ्रा आदी सेक्टरमधील शेअर दरात तेजी दिसून आली.

निफ्टीचाही उच्चांक
बँक निफ्टीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. बँक निफ्टीने ४३,००० अंकांचा टप्पा ओलांडत ४३,०७५ अंकांवर बंद झाला. निफ्टीतील ५० पैकी ४३ कंपन्यांचे शेअर्स वधारले होते, तर ७ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या