22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडाभारताच्या तेजस्वीन शंकरने रचला इतिहास

भारताच्या तेजस्वीन शंकरने रचला इतिहास

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहॅम : भारताच्या तेजस्वीन शंकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. शंकरने उंच उडी प्रकारात भारताला या स्पर्धेतील पहिले कांस्यपदक जिंकवून दिले. भारताचा तेजस्वीन शंकर पहिल्याच प्रयत्नात २.१० मीटरच्या उंच उडीच्या स्पर्धेत संयुक्त अव्वल स्थानावर होता. तेजस्वीन शंकरसाठी २.१५ मीटर हा पुढचा अडथळा होता आणि तो त्याच्या संधीची शांतपणे वाट पाहत होता.

आतापर्यंत अनेक खेळाडूंना पहिल्याच प्रयत्नात ते पार करण्यात अपयश आले होते. पण त्याने २.१५ मीटरचा टप्पाही यशस्वीपणे पार केला. त्यानंतर तेजस्वीन शंकरने २.१९ मीटर उडी मारत आपण पदकाचे दावेदार असल्याचे स्पष्ट केले. पण त्यानंतर मात्र त्याच्याकडून एक चूक घडली आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या