27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविनाकारण भीती दाखवून अ‍ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयाला दणका

विनाकारण भीती दाखवून अ‍ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयाला दणका

एकमत ऑनलाईन

16 लाखांचा दंड : राज्यातील ही पहिलीच मोठी कारवाई

ठाणे, 7 जून : रुग्णांना विनाकारण भीती दाखवून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करुन घेतले आणि अव्वाच्या सव्वा बील आकारले म्हणून ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील दोन खासगी हॉस्पिटलला मोठा दणका दिला आहे. या खासगी हॉस्पिटलला पालिकेकडून 16 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांककडून हॉस्पिटल विरोधात तक्रारी येत होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन हॉस्पिटल्सनी 13 ठाणेकरांना दाखल करुन घेतले होते आणि त्यांच्यावर 7 दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बीले आकारली होती.

Read More  शाळा आणि महाविद्यालये १५ ऑगस्टनंतरच सुरु होणार-डॉ. रमेश पोखरियाल

याबाबत ठाणे महानगर पालिकेकडे तक्रारा आल्यावर ठाणे महानगर पालिकेने चौकशी करुन या दोन हाॉस्पिटलवर कारवाई केली आहे.अशा प्रकारे नागरिकांची पिळवणूक झाल्यानंतर त्या हॉस्पिटलवर कारावई होणे ही राज्यातील पहिलीच वेळ असून यामुळे आता विनाकारण उपचार करणाऱ्यांना चपराक बसण्यास मदत होईल. ठाण्यात या आधीदेखील अशा तक्रारी आल्या होत्या. तसंच थायरो केअर नावाच्या एका लॅबला ठाणे महानगर पालिकेने स्वॅब टेस्ट न करण्याची नोटीस धाडली. काही लॅबने स्वॅब टेस्ट केल्या होत्या. मात्र त्यांचे अहवाल हे चुकीचे आल्याने नागरिकांना मनस्ताप झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या