23.2 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeमहाराष्ट्रनागपूर विमानतळावर लागले ‘कर्नाटकात या’ असे होर्डिंग

नागपूर विमानतळावर लागले ‘कर्नाटकात या’ असे होर्डिंग

एकमत ऑनलाईन

– सीमावादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
नागपूर : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वाद दिवसेंदिवस पेटत चालला आहे. रविवारी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर आले. मात्र, विमानतळातून बाहेर निघण्याच्या मार्गावर असलेल्या मोक्याच्या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाचे होर्डिंग लावण्यात आले आहे.

‘सी कर्नाटका ए न्यू’ असे कर्नाटक पर्यटन विभागाचे होर्डिंग विमानतळावर लावले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पर्यटनमंत्री आनंद सिंग यांची छायाचित्रे असलेल्या होर्डिंगवर ‘अवर स्टेट मेनी प्राईड’ असे घोषवाक्य लिहिलेले आहे.

विमानतळाबाहेर अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेले कर्नाटक सरकारचे हे होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या गावातही सरकारचा पिच्छा सोडला नाही, अशी चर्चा रंगली आहे. तसेच, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या पार्श्वभूमीवर या होर्डिंगमुळे राजकीय वातावरण तापण्याचीही चिन्हे आहेत.

रोज नवा वाद
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकचा असल्याचा दावा केला आणि हा सीमावाद पुन्हा एकदा पेटला. महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी यावरून टीका केली. त्यामुळे नेहमीप्रमाणे हा मुद्दा आणखी चर्चेत आला. बोम्मई रोज नवा वाद उभा करीत आहेत. अक्कलकोटमध्ये कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा करीत बोम्मई यांनी वातावरण तापवले आहे.

अजून सीमावादावर तोडगा नाही
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशके सुरू आहे. तो सोडवण्यासाठी शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. त्यानंतरही वाद चिघळत चालला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या, सांगलीतील जवळपास ४२ गावांवरही ताबा सांगितला आहे. वर्षे उलटली पण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर तोडगा निघाला नाही. आंदोलने झाली, कितीदातरी दगडफेक झाली. पण अनेक वर्षांनंतरही हा वाद असाच कायम आहे आणि वेळोवेळी उफाळून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या