19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयक्षुल्लक गोष्टींचे राजकारण नको, राहुल गांधींच्या प्रश्नांना गृहमंत्री अमित शहांनी दिले प्रत्युत्तर

क्षुल्लक गोष्टींचे राजकारण नको, राहुल गांधींच्या प्रश्नांना गृहमंत्री अमित शहांनी दिले प्रत्युत्तर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली | भारत-चीनच्या चिघळलेल्या संघर्षाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले. एकीकडे देशभरात या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरु आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांत पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने अनेक प्रश्न विचारले आहेत. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल (२० जून) पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर, पंतप्रधानांनी ‘चिनी सैन्य भारतीय हद्दीत शिरलेच नाही’, असा दावा केला. त्यानंतर पुन्हा राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित केले.दरम्यान, राहुल गांधींच्या प्रश्नांना आता गृहमंत्री अमित शहांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्या ट्विटमध्ये अमित शहांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या एका जवानाच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात या प्रकरणाचे राजकारण कोणीही करून नये, असे आवाहन एका शहीद जवानांच्या वडिलांनी केले आहे. त्याचसोबत अमित शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, ‘एका शूर जवानाच्या वडिलांनी या व्हिडिओत स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. आजच्या संपूर्ण देश एकत्र आला आहे. अशा कठीण स्थितीत राहुल गाणी क्षुल्लक कारणांवरून राजकारण करू नये. या अशा प्रकारच्या राजकारणातून बाहेर यायला हवे. राष्ट्रहितासाठी एकत्रितपणे, एकसंघ होऊन उभे राहायला हवे’, असे ट्विट अमित शहांनी केले आहे.

राहुल गांधींनी कोणते सवाल उपस्थित केले ?

सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधानांनी असा दावा केला कि, ‘चीनचे सैन्य भारतीय हद्दीत घुसलेच नाही.’ पंतप्रधानांच्या या विधानांनंतर राहुल गांधींनी एक ट्विट केले. ‘चीनच्या आक्रमकतेमुळे पंतप्रधानांनी भारतीय भूभाग चीनच्या हवाली केला. जर तो भूभाग चीनचा होता तर मग भारतीय जवानांना का मारण्यात आले ? कुठे मारण्यात आले’, असे सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले.

Read More भारतीय लष्कराच्या या शौर्याचे तैवान टाइम्सने मोठे कौतुक : ‘इंडियाज रामा टेक्स ऑन चायनाज ड्रगॉन ‘

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या