26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयअमरनाथ यात्रा प्रकरणी गृहमंत्री अमित शहांची उच्चस्तरीय बैठक

अमरनाथ यात्रा प्रकरणी गृहमंत्री अमित शहांची उच्चस्तरीय बैठक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवार दि. १७ मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यात आला. दोन वर्षांनंतर ही वार्षिक यात्रा ३० जूनपासून सुरू होत आहे. यंदा सुमारे तीन लाख भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनीही याच मुद्द्यावर नुकतीच बैठक घेतली.

गृहसचिव भल्ला यांनी आतापर्यंत अशा दोन बैठका घेतल्या आहेत. यापैकी एक १३ मे रोजी दिल्लीत आणि दुसरी जम्मू-काश्मीरमध्ये १५ एप्रिल रोजी घेण्यात आली. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख अरव्ािंद कुमार, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह, जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग स्ािंह यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अमरनाथ बोर्डाचे सदस्यही व्हिडिओ कॉन्फरन्ंिसगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी अमित शहांना प्रवासी भागातील परिस्थिती आणि सुरक्षेशी संबंधित सर्व अपडेट्सची माहिती देण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवाद्यांकडून टार्गेट किल्ािंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने अमरनाथ यात्रा हे एक आव्हानात्मक काम आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे. विशेष म्हणजे, या यात्रेची ऑनलाइन नोंदणी ११ एप्रिलपासून सुरू झाली आहे. ही अमरनाथ यात्रा ४३ दिवसांची असून ती ३० जून ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या