Wednesday, September 27, 2023

गृहमंत्र्यांचा कडक इशारा : अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकाल तर खपवून घेणार नाही

लॉकडाऊनच्या काळामध्ये सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ : अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ केले जात आहेत व्हायरल 

मुंबई : सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकाल तर ते खपवून घेणार नाही. त्यावर लगोलग तातडीने कारवाई केली जाईल. यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इशारा दिला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. व्हॉट्सअ‌ॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरून महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.

Read More  भालकीहून आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला

तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जात असून धार्मित तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टही टाकण्यात येत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

टिकटॉकवर अ‌ॅसिड अ‌ॅटॅक आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ
टिकटॉकवर अ‌ॅसिड अ‌ॅटॅक आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ व्हायरल केले गेले आहेत. या प्रकरणाचीगंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं, सायबर गुन्ह्यांप्रकरणी आतापर्यंत 410 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 213 जणांना अटक करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या