24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeहोमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम 30 गुणकारी

होमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम 30 गुणकारी

एकमत ऑनलाईन

नगर -जगभरात करोनाची साथ पसरली आहे. लाखो लोकांना त्याची लागण झाली आहे. अनेकांचा त्यात मृत्यू झाला. भारतातही हा रोग झपाट्याने पसरत आहे. तथापि, अजूनही त्यावर थेट लस उपलब्ध नाही. मात्र, होमिओपॅथीक आर्सेनिक 30 हे औषध त्यावर गुणकारी ठरले असून, त्याचा सर्वांनी वापर करावा, असे विचार डॉ. सोमीनाथ गोपाळघरे यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीच्या अरसेनिक अल्बम 30 ह्या औषधाची शिफारस केलेली आहे. हे औषध करोनाविरुद्ध रोग प्रतिकारशक्ती वाढवते व करोनापासून आपला बचाव होतो, अशी भूमिका डॉ. गोपाळघरे यांनी व्यक्त केली. नगर शहराती पाच हजार कुटुंबाना या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. बसस्थानकांवर जमलेल्या प्रवाश्‍यांनाही या औषधाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नीतेश बनसोडे व त्यांच्या संकल्प प्रतिष्ठानचे हे औषध वाटपासाठी पुढाकार घेतला.

Read More  10 ते 12 मृत्युमुखी : पश्चिम बंगाल, ओदिशात अम्फान चक्रीवादळाचा कहर

सावलीच्या टीमने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी बांधवांनासाठी दीपक पाटील, पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, परिवहन महामंडळाचे वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड व अहमदनगर प्रेस क्‍लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्याकडे ही औषधे पोच करण्यात आली. केरळ तसेच इतर 8 राज्यांनी हेच औषध लाखो लोकांना वाटल्याने ह्या रोगाचा प्रसार थांबला व त्यामुळे करोनावर उत्तम रित्या नियंत्रण आणता आले. सर्वांनी प्रत्येकी 4 गोळ्या रोज सकाळी उपाशी पोटी एकदा असे 3 दिवस घ्याव्यात, असे आवाहन डॉ. गोपाळघरे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या