नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय बॉंिक्सग असोसिएशनने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय रँंिकगमध्ये मोठा इतिहास रचला आहे. भारत रँकिंगमध्ये तिस-या स्थानावर पोहचला आहे. भारतीय बॉक्सर्सनी ३६ हजार ३०० रँकिंग गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांनी अमेरिका आणि क्यूबा सारख्या टॉप बॉक्सिंग नेशन्सला मागे टाकले आहे.
अमेरिका चौथ्या तर क्यूबा हा नवव्या स्थानावर पोहचला आहे. कझाकिस्तान ४८ हजार १०० रँकिंगगुण घेऊन अव्वल स्थानावर आहे. तर उज्बेकिस्तान ३७ हजार ६०० गुण घेत दुस-या स्थानावर आहे. भारताच्या बॉक्सर्ससाठी गेले वर्ष खूप चांगले गेले आहे. भारतीय बॉक्सर सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा यासारख्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धात टॉप ५ देशांमध्ये भारतीय संघ राहिला आहे. गेल्या दोन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय बॉक्सर्सनी १६ पदके जिंकली आहेत. २००८ पासून अव्वल आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताने १४० पदके जिंकले आहेत. तर २०१६ पासून भारतीय बॉक्सिंग पुरूष आणि महिला विभागात १६ एलीट वर्ल्ड चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.
भारतीय बॉंिक्सग महासंघाने अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन देखील केले आहे. आता १५ ते २६ मार्चदरम्यान भारतात तिस-यांदा महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतात बॉक्सिंगचे भविष्य उज्ज्वल आहे. भारताने गेल्या दोन युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ज्युनियर आणि युवा स्तारावर एकूण २२ पदके जिंकली आहेत. बीएफआयचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले की भारत, बीएफआय आणि सर्व क्रीडा प्रेमींसाठी भारताची तिसरी रँकिंग हा एक मैलाचा दगड आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बॉक्सर्सनी ४४ व्या स्थानावरून तिस-या स्थानापर्यंत झेप घेतली आहे.