23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटकात भीषण अपघात; ७ जण ठार, २६ जखमी

कर्नाटकात भीषण अपघात; ७ जण ठार, २६ जखमी

एकमत ऑनलाईन

धारवाड : कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. हुबळी-धारवाडच्या तरीहाळा बायपासवर भीषण अपघात झाला आहे. यात ट्रक आणि खासगी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात ७ जण जागीच ठार झाले असून २६ जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये कर्नाटकातील दोघांचा समावेश आहे, तर ६ जण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील होते. अपघातातील जखमींवर हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एक खाजगी प्रवासी बस ही कोल्हापूरहून बंगळुरूकडे निघाली होती. याच प्रवासी बसची आणि एका ट्रकची आमने-सामने जोरदार धडक झाली. मध्यरात्री साडेबारा ते एक दरम्यान हा भीषण अपघात घडला आहे. बसचा ड्रायव्हर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या अपघाताबाबत एफआयआर नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे हुबळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात इतका भीषण झाला आहे की बसच्या समोरील भागाचा पूर्णत: चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच धारवाडमध्येही अपघाताची घटना घडली होती. यात ७ जण ठार झाले होते. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एका या अपघाताच्या धक्कादायक घटनेने हुबळीकर हळहळ व्यक्त होत आहे. लग्नकार्य उरकून परतत असताना धारवाडमधील अपघातात सात जणांना जिवाला मुकावे लागले होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या